PM Internship Scheme 2025 Phase 2, अंतिम तारीख, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

मित्रांनो तुमचं वय 21 ते 24 दरम्यान आहे आणि तुम्ही सध्या शिक्षण किंवा नोकरी करत नसाल? तर तुमच्यासाठी एक जबरदस्त संधी चालून आली आहे! केंद्र सरकारने सुरू केलेल्या PM Internship Scheme 2025 च्या Phase 2 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवण्यात आली आहे. आता तुम्ही 15 एप्रिल 2025 पर्यंत अर्ज करू शकता.

या इंटर्नशिपमधून तुम्हाला ना फक्त दरमहा 5000 रुपये स्टायपेंड मिळणार आहे, तर सरकारसोबत काम करून प्रत्यक्ष अनुभव आणि प्रोफेशनल नेटवर्किंगची संधी मिळणार आहे. म्हणजेच पैसाही मिळेल, अनुभवही मिळेल आणि ते सुद्धा सरकारसोबत काम करताना. जर तुम्ही या सुवर्णसंधीचा फायदा घेण्यास इच्छुक असाल, तर पुढे वाचा. पात्रता, फायदे आणि संपूर्ण अर्ज प्रक्रिया इथे तुम्हाला सविस्तर समजावून दिली आहे.

PM Internship Scheme 2025 Phase 2, अंतिम तारीख, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

या योजनेच मुख्य वैशिष्ट्ये काय आहे?

अर्जाची नवीन अंतिम तारीख15 एप्रिल 2025
स्टायपेंड5000 रुपये प्रतिमाह (4500 रुपये केंद्र सरकार + 500 रुपये कंपनीचे CSR फंड)
एकूण रक्कम6000 रुपये अतिरिक्त
इंटर्नशिप कालावधी2-6 महिने
अर्ज लिंकpminternship.mca.gov.in

PM Internship Scheme 2025 साठी पात्रता काय आहे?

मित्रांनो PM Internship Scheme 2025 साठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचे वय हे 21 ते 24 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. उमेदवार सध्या कोणत्याही पूर्णवेळ शिक्षणात किंवा नोकरीत सहभागी नसावा. मात्र, ऑनलाईन किंवा डिस्टन्स एज्युकेशन घेत असलेले विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्याचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे. जर कुटुंबातील कोणत्याही सदस्याची स्थायी सरकारी नोकरी असेल, तर अशा घरातील विद्यार्थी या योजनेसाठी अपात्र ठरतात.

याव्यतिरिक्त, IIT, IIM, IISER, NID, IIIT, NLU यासारख्या नामांकित संस्थांतून पदवी घेतलेले विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकत नाहीत. तसेच, CA, CMA, CS, MBBS, BDS, MBA किंवा मास्टर्स डिग्रीधारक विद्यार्थीही या योजनेसाठी पात्र नाहीत. या योजनेअंतर्गत अशा विद्यार्थ्यांनाही अपात्र मानले जाईल जे आधीच केंद्र सरकारच्या कोणत्याही योजनेअंतर्गत कौशल्य प्रशिक्षण (skill training) घेत आहेत.

🖇️ हेही वाचा:

जर तुम्हाला Neet परीक्षा काय असते आणि त्याची तयारी कशी करायची असते हे जाणून घ्यायचं असेल, हा लेख तुमच्यासाठी आहे.

➤ NEET परीक्षा कशी असते आणि तयारी कशी करावी?

अर्ज प्रक्रिया काय आहे ?

  • अधिकृत वेबसाइटला भेट द्या: https://pminternship.mca.gov.in
  • “Registration” लिंकवर क्लिक करा.
  • मोबाईल नंबर वापरून रजिस्ट्रेशन करा.
  • अर्ज फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • सबमिट करण्यापूर्वी अर्ज पुन्हा एकदा तपासा.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर प्रिंटआउट काढून ठेवा.

फायदे काय आहेत?

  • सरकारी कामाचा प्रत्यक्ष अनुभव
  • प्रोफेशनल नेटवर्किंग
  • स्टायपेंडसह आर्थिक मदत
  • प्रमाणपत्रामुळे भविष्यात नोकरीत फायदा
  • एक खट्टी रक्कम आणि ऑन-जॉब लर्निंगचा अनुभव.

PM Internship Scheme 2025 Phase 2 ही फक्त एक इंटर्नशिप नाही, तर तुमच्या करिअरची मजबूत पायाभरणी करणारी संधी आहे. सरकारसोबत काम करताना तुम्हाला अनुभव, स्टायपेंड, आणि एक प्रमाणपत्र मिळेल. जे भविष्यातील नोकरी किंवा अभ्यासक्रमांसाठी खूप उपयुक्त ठरेल.

तर मित्रांनो, अजून वेळ आहे! 15 एप्रिल 2025 ही शेवटची तारीख लक्षात ठेवा आणि तुमचं अर्ज लवकरात लवकर सबमिट करा. कधी कधी एक छोटा निर्णय तुमचं भविष्यातलं मोठं यश ठरवू शकतो आणि ही संधी तशीच आहे.

आता वेळ आहे पुढे जाण्याची. अर्ज करा, अनुभव मिळवा आणि तुमचं प्रोफेशनल करिअर मजबूत करा!

Leave a Comment