मित्रांनो स्पर्धा परीक्षेची तयारी असो किंवा शालेय अभ्यास, यशाचे सर्वात मोठे गुपित म्हणजे ‘योग्य नियोजन’. तुमच्या वेळेचा प्रत्येक सेकंद सत्कारणी लागावा यासाठी Dnyanshala Media Network घेऊन आले आहे एक खास Universal Timetable Generator. हे टूल तुम्हाला कोणत्याही मर्यादेशिवाय, पूर्णपणे तुमच्या आवडीनुसार आणि मॅन्युअली तुमचे स्वतःचे वेळापत्रक बनवण्याची सुविधा देते. आता वेळेचे गणित मांडणे झाले अधिक सोपे आणि प्रोफेशनल.
How to Use (हे टूल कसे वापरावे?)
हे टूल वापरणे अत्यंत सोपे आहे, खालील स्टेप्स फॉलो करा,
- सर्वात आधी तुमचे नाव आणि तुमच्या परीक्षेचे किंवा ध्येयाचे नाव टाका.
- नंतर तुमच्या अभ्यासाची किंवा कामाची सुरुवात आणि संपण्याची वेळ (Start & End Time) मॅन्युअली सेट करा.
- तुम्ही त्या वेळेत काय करणार आहात (उदा. अभ्यास, व्यायाम, रिव्हिजन) आणि त्याचा सविस्तर तपशील मॅन्युअली टाईप करा.
- जर तुम्हाला दिवसभरातील अजून टप्पे जोडायचे असतील, तर ‘+ अजून वेळ जोडा’ बटणावर क्लिक करा.
- सर्व माहिती भरून झाल्यावर ‘वेळापत्रक पहा’ बटणावर क्लिक करा.
- तयार झालेले वेळापत्रक तुम्ही PDF स्वरूपात डाऊनलोड करू शकता किंवा त्याची प्रिंट काढून तुमच्या अभ्यासाच्या टेबलासमोर लावू शकता.
Demo (एक नमुना वेळापत्रक)
हे टूल वापरल्यानंतर तुमचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आकर्षक दिसेल:
| वेळ (Time) | कृती (Activity) | तपशील (Details) |
|---|---|---|
| ०५:३० – ०७:३० | मैदानी सराव | १६०० मीटर रनिंग आणि गोळाफेक सराव |
| ०९:०० – ११:३० | मराठी व्याकरण | प्रयोग, समास आणि शब्दसिद्धी उजळणी |
| १२:३० – ०२:०० | विश्रांती | दुपारचे जेवण आणि चालू घडामोडी वाचन |
| ०४:०० – ०६:३० | गणित व बुद्धिमत्ता | नफा-तोटा आणि वयवारी प्रश्न संच सोडवणे |
| ०८:३० – १०:०० | सराव परीक्षा | मागील वर्षाची प्रश्नपत्रिका विश्लेषण |
टीप: हे टूल पूर्णपणे Privacy Friendly आहे. तुमची माहिती कुठेही सेव्ह केली जात नाही, ती केवळ तुम्हाला वेळापत्रक तयार करून देण्यासाठी वापरली जाते.
Dnyanshala Universal Planner
नियोजन करा, यश मिळवा!
| वेळ | कृती | तपशील |
|---|
(वरील बटणाने फक्त वेळापत्रक सेव्ह होईल)