भारताची पहिली महिला शिक्षिका – सावित्रीबाई फुले

जन्म आणि बालपण

3 जानेवारी 1831 रोजी साताऱ्यातील नायगाव येथे जन्म. एक सामान्य कुटुंबातून आलेल्या सावित्रीबाईंनी इतिहास घडवला.

लवकर लग्न, मोठी स्वप्नं

वयाच्या 9व्या वर्षी ज्योतिराव फुले यांच्याशी विवाह. साथ दिला शिक्षण आणि समाजसुधारणेसाठी.

शिक्षणाची सुरुवात

ज्योतिरावांनी सावित्रीबाईंना घरी शिकवले. स्वतः शिकून त्या शिक्षिका झाल्या.

1848 - शिक्षणक्रांतीची सुरुवात

पुण्यात भिडे वाड्यात भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू. सुरुवात फक्त 6 मुलींनी केली.

अडचणींचा सामना

समाजाकडून अपमान, दगडफेक, टीका... पण सावित्रीबाई डगमगल्या नाहीत!

महिलांसाठी आश्रम आणि मदत केंद्र

विधवा आणि गरजू महिलांसाठी शिक्षण व प्रशिक्षण केंद्र उभारले.

बालहत्या प्रतिबंधक गृह - 1863

विधवा महिलांच्या बाळांना संरक्षण. समाजाच्या काळ्या वास्तवाविरुद्ध मोठं पाऊल!

आंतरजातीय विवाह व सामाजिक समता

ब्राह्मण विधवेच्या मुलाला दत्तक घेतले.जातिव्यवस्थेविरुद्ध ठाम उभ्या राहिल्या.

सत्यशोधक समाजात सक्रीय भूमिका

1873 मध्ये ज्योतिरावांनी स्थापन केलेल्या समाजात तेवढ्याच ताकदीने योगदान.

Legacy - आजची प्रेरणा

सावित्रीबाई म्हणजे शिक्षण, संघर्ष आणि स्त्रीशक्तीचं ज्वलंत उदाहरण. त्यांचा इतिहास हा आपल्या भविष्याचा मार्गदर्शक आहे.