मित्रांनो तुमच्या उच्च शिक्षणाच्या स्वप्नांना ‘आर्थिक बळ’ देणारी एक जबरदस्त संधी चालून आली आहे. जर तुम्ही डॉक्टर, इंजिनिअर, बँकिंग किंवा मॅनेजमेंट क्षेत्रात करिअर करून स्वतःला सिद्ध करू इच्छित असाल, पण वाढत्या फीची चिंता सतावत असेल, तर आता काळजी सोडा. Federal Bank Hormis Memorial Foundation Scholarship 2025-26 ही खास तुमच्यासारख्या जिद्दी आणि गुणवंत विद्यार्थ्यांसाठी बनलेली एक ‘सुवर्णसंधी’ आहे. महाराष्ट्रातील हुशार विद्यार्थ्यांना थेट 100% ट्यूशन फी परतावा (Reimbursement) मिळवून देणारी ही प्रतिष्ठित शिष्यवृत्ती तुमच्या उज्ज्वल भविष्याची गुरुकिल्ली ठरू शकते.
हे सुद्धा वाचा:- Colgate Keep India Smiling Scholarship 2025-26: BDS आणि MDS विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी!
Federal Bank Hormis Memorial Foundation Scholarship 2025-26: पात्रता, फायदे आणि अर्ज प्रक्रिया
| स्कॉलरशिपचे नाव | फेडरल बँक हॉर्मिस मेमोरियल फाउंडेशन शिष्यवृत्ती 2025-26 |
| पात्र राज्ये | महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, केरळ, पंजाब आणि तामिळनाडू |
| पात्र कोर्सेस (फक्त 1 ले वर्ष) | MBBS, Engineering, B.Sc. Nursing, MBA, Agriculture, B.Sc. (Banking) |
| उत्पन्न मर्यादा | वार्षिक 3 लाखांपेक्षा कमी |
| मिळणारे फायदे | 100% ट्यूशन फी परतावा (Reimbursement) |
| अर्ज पद्धत | फक्त ऑनलाईन (Online Only) |
| शेवटची तारीख | 31 डिसेंबर 2025 |
ही शिष्यवृत्ती व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या (Professional Courses) पहिल्या वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, केरळ, पंजाब आणि तामिळनाडू या राज्यांतील हुशार विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
पात्रता काय आहे? (Eligibility)
अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्याने खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे, विद्यार्थी खालीलपैकी कोणत्याही एका अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात शिकत असावा.
- MBBS
- इंजिनिअरिंग (B.E./B.Tech)
- B.Sc. नर्सिंग (Nursing)
- MBA
- B.Sc. कृषी (Agriculture)
- B.Sc. (ऑन्स) को-ऑपरेशन आणि बँकिंग (Co-operation & Banking)
2025-26 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्याचा प्रवेश गुणवत्तेच्या आधारावर (Merit-based) झालेला असावा. (शासकीय/अनुदानित/मान्यताप्राप्त विनाअनुदानित/स्वायत्त महाविद्यालयात). कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3,00,000 (3 लाख) पेक्षा जास्त नसावे.
हे सुद्धा वाचा:- GSK Scholars Program 2025-26: MBBS First Year विद्यार्थ्यांसाठी 1 Lakh Scholarship Opportunity
फायदे आणि बक्षिसे (Prizes & Rewards)
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 100% ट्यूशन फी (Tuition Fees) परत दिली जाईल (Reimbursement).
तसेच इतर शैक्षणिक फायदेही मिळतील.
आवश्यक कागदपत्रे (Documents Required)
अर्ज करताना तुम्हाला खालील कागदपत्रे स्कॅन करून जोडावी लागतील. त्यामुळे ती आधीच तयार ठेवा,
- आधार कार्ड (Aadhar Card) किंवा पॅन कार्ड.
- तुम्ही महाराष्ट्र (किंवा पात्र राज्यांपैकी एक) राज्याचे रहिवासी असल्याचा पुरावा.
- प्रवेशाचा पुरावा (Admission Proof): 2025-26 या वर्षात तुम्ही प्रवेश घेतल्याचे महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र (Bonafide Certificate) किंवा अलॉटमेंट लेटर.
- तुम्ही कॉलेजची फी भरली असल्याची चालू वर्षाची पावती.
- १०वी आणि १२वी ची गुणपत्रके.
- पालकांचे वार्षिक उत्पन्न ३ लाखांपेक्षा कमी असल्याचा सरकारी सक्षम अधिकाऱ्याने (तहसीलदार इ.) दिलेला दाखला.
- विद्यार्थ्याच्या नावावर असलेल्या बँक खात्याच्या पासबुकची प्रत (बँकेचे नाव, खाते क्रमांक आणि IFSC कोड स्पष्ट असावा).
- विद्यार्थ्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो.
हे सुद्धा वाचा:- Rolls-Royce Wings4Her Scholarship 2025-26: महिला इंजिनिअरिंग विद्यार्थिनींसाठी सुवर्णसंधी!
निवड प्रक्रिया (Selection Process)
फक्त अर्ज केला म्हणजे शिष्यवृत्ती मिळेल असे नाही, त्याची निवड प्रक्रिया खालील टप्प्यांत होते,
- 12वी चे गुण आणि कुटुंबाचे उत्पन्न या आधारावर सुरुवातीला विद्यार्थ्यांची यादी तयार केली जाते.
- निवडलेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाते.
- हे या शिष्यवृत्तीचे वैशिष्ट्य आहे. शॉर्टलिस्ट झालेल्या विद्यार्थ्यांची अनेकदा वैयक्तिक किंवा टेलिफोनिक मुलाखत घेतली जाते. यामध्ये तुमच्या भविष्यातील योजना आणि आर्थिक गरजेबद्दल विचारले जाते.
- मुलाखतीनंतर अंतिम यादी जाहीर केली जाते.
शिष्यवृत्ती मिळण्याबाबत महत्त्वाच्या अटी
- ही शिष्यवृत्ती एकदा मिळाली की पुढच्या वर्षांच्या शिक्षणासाठीही चालू राहू शकते, पण त्यासाठी तुम्हाला प्रत्येक वर्षी परीक्षेत उत्तीर्ण व्हावे लागेल आणि चांगली प्रगती दाखवावी लागेल.
- जर तुम्हाला इतर कोणतीही मोठी सरकारी किंवा खाजगी शिष्यवृत्ती मिळत असेल, तर तुम्ही या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरणार नाही (किंवा मिळणारी रक्कम कमी होऊ शकते).
- शिष्यवृत्तीची रक्कम थेट विद्यार्थ्याच्या बँक खात्यात जमा होते, त्यामुळे बँक खाते ‘Active’ असणे गरजेचे आहे. अनेकदा फेडरल बँकेत खाते उघडण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो (हे निवडीनंतर स्पष्ट केले जाते).
हे सुद्धा वाचा:- Aditya Birla Capital Scholarship 2025-26: मुलींसाठी 60,000 रुपये पर्यंत शिष्यवृत्तीची सुवर्णसंधी!
अर्ज कसा करावा? (Step-by-Step)
- वर दिलेल्या लिंकवर (www.b4s.in/jiui/FHMF2) क्लिक करा (ही लिंक Buddy4Study या प्लॅटफॉर्मची आहे).
- तिथे ‘Apply Now’ बटणावर क्लिक करा.
- तुमचा मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी वापरून लॉगिन/रजिस्टर करा.
- ‘Start Application’ वर क्लिक करून फॉर्म भरा.
- वर सांगितलेली सर्व कागदपत्रे अपलोड करा.
- ‘Preview’ करून सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री करा आणि ‘Submit’ करा.
महत्त्वाची तारीख
| तपशील (Details) | महत्त्वाची तारीख (Date) |
|---|---|
| शिष्यवृत्तीचे नाव | फेडरल बँक हॉर्मिस मेमोरियल फाउंडेशन शिष्यवृत्ती 2025-26 |
| शैक्षणिक वर्ष | 2025-26 |
| अर्ज प्रक्रिया स्थिती | सुरू आहे (Ongoing) |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 31 डिसेंबर 2025 |
| महत्त्वाच्या लिंक्स (Important Links) | |
|---|---|
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी (Apply Online) | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |