मित्रांनो तुम्ही जर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अधिकारी (Officer) होण्याचे स्वप्न पाहत असाल, तर ही वेळ तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी घेऊन आली आहे. पण फक्त स्वप्न पाहून चालणार नाही, तर त्याला योग्य दिशेची आणि नियोजनाची जोड हवी. कोणत्याही परीक्षेच्या यशाची पहिली पायरी म्हणजे तिचा अभ्यासक्रम समजून घेणे. म्हणूनच, आजच्या या लेखात आम्ही तुमच्यासाठी SBI CBO Syllabus PDF 2026 ची संपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत. सोबतच, या परीक्षेचे बदलते स्वरूप समजून घेण्यासाठी SBI CBO Exam Pattern 2026 चे सविस्तर विश्लेषण देखील खाली दिले आहे, जे तुम्हाला पहिल्याच प्रयत्नात यश मिळवून देण्यासाठी नक्कीच मदत करेल.
SBI CBO च्या निवडीसाठी ऑनलाइन लेखी परीक्षा, स्क्रीनिंग आणि मुलाखत हे टप्पे आहेत. उमेदवारांना प्रत्येक टप्प्यात स्वतंत्रपणे उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. एकूण २ चाचण्या असतील: MCQ आणि डिस्क्रिप्टिव्ह.
कॉम्प्युटर बेस्ड टेस्टमध्ये 120 प्रश्न असतील आणि प्रत्येकी 1 गुण असेल.
एकूण वेळ 2 तास 30 मिनिटे असेल (2 तास ऑब्जेक्टिव्हसाठी आणि 30 मिनिटे डिस्क्रिप्टिव्हसाठी).
या परीक्षेत कोणतेही निगेटिव्ह मार्किंग नाही.
SBI CBO ऑनलाइन परीक्षा पॅटर्न (CBT)
विषय (Sections)
प्रश्न संख्या
गुण
कालावधी
इंग्रजी भाषा (English Language)
30
30
30 मिनिटे
बँकिंग नॉलेज (Banking Knowledge)
40
40
40 मिनिटे
जनरल अवेअरनेस / इकॉनॉमी
30
30
30 मिनिटे
कॉम्प्युटर ॲप्टीट्यूड (Computer Aptitude)
20
20
20 मिनिटे
एकूण
120
120
2 तास
SBI CBO डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट पॅटर्न
विषय
प्रश्न
गुण
कालावधी
पत्र लेखन (Letter Writing)
01
25
30 मिनिटे
निबंध लेखन (Essay – 250 words)
01
25
एकूण
02
50
30 मिनिटे
विषयानुसार अभ्यासक्रम (Subject-wise Syllabus)
English Language: या विषयात प्रामुख्याने Cloze Test, Reading Comprehension (RC), Spotting Errors, Sentence Improvement, Sentence Correction, Para Jumbles, Fill in the Blanks आणि Para/Sent Completion या घटकांचा समावेश असेल.
General Awareness (GA): चालू घडामोडी (Current Affairs), बँकिंग अवेयरनेस, GK अपडेट्स, विविध देशांचे चलन (Currencies), महत्त्वाची ठिकाणे, पुस्तके आणि लेखक, पुरस्कार, संस्थांची मुख्यालये (Headquarters), पंतप्रधान योजना, महत्त्वाचे दिवस आणि बेसिक कॉम्प्युटर नॉलेज यांवर प्रश्न विचारले जातील.
Computer Knowledge: संगणकाचा इतिहास आणि पिढ्या (Generations), कॉम्प्युटर ऑर्गनायझेशन, मेमरी, हार्डवेअर आणि I/O डिव्हाइसेस, सॉफ्टवेअर, कॉम्प्युटर लँग्वेजेस, ऑपरेटिंग सिस्टीम (OS), कॉम्प्युटर नेटवर्क, इंटरनेट आणि नेटवर्क सिक्युरिटी हे मुद्दे महत्त्वाचे आहेत.
Banking Awareness: यामध्ये बँकिंग टर्मिनॉलॉजी, फायनान्शियल अवेअरनेस, महत्त्वाच्या वित्तीय संस्थांची माहिती, विम्याची तत्त्वे (Principles of Insurance) आणि मनी व बँकिंग यांसारखे कोअर बँकिंग विषय कव्हर केले जातील.