SBI Platinum Jubilee Asha Scholarship 2025 : गरीब-हुशार मुलांची मोठी संधी, अर्ज 15 नोव्हेंबरपर्यंत

मित्रा तू हुशार आहेस, शिकायची जिद्द आहे, पण खिशात पैसा नाही… हे चित्र आपल्या गावाकडं नेहमीच दिसतं. कितीतरी मुलं भारी गुण काढतात, पण पैशाअभावी कॉलेजचं दार ओलांडू शकत नाहीत. ह्याच वेळी SBI Foundation पुढं आलंय. SBI Platinum Jubilee Asha Scholarship 2025 हीच त्या गरीब-हुशार मुलांची खरी आशा ठरणार आहे. चला तर मग जाणून घेऊया याबद्दल संपूर्ण माहिती.

SBI Platinum Jubilee Asha Scholarship 2025 : गरीब-हुशार मुलांची मोठी संधी, अर्ज 15 नोव्हेंबरपर्यंत

मुद्दातपशील
शिष्यवृत्तीचे नावSBI Platinum Jubilee Asha Scholarship 2025
आयोजित संस्थाSBI Foundation
अर्जाची सुरुवात19 सप्टेंबर 2025
अर्जाची शेवटची तारीख15 नोव्हेंबर 2025
पात्रतामागील वर्षी 75% गुण / 7 CGPA (SC/ST – 67.5% / 6.3 CGPA), उत्पन्न मर्यादा शालेय विद्यार्थ्यांसाठी ₹3 लाख व इतर विद्यार्थ्यांसाठी ₹6 लाख
शिष्यवृत्ती रक्कम15,000 ते 20,00,000 रुपये पर्यंत (शिक्षणाच्या स्तरानुसार)
अर्ज करण्याची पद्धतअधिकृत वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज 👉 sbischolarship.co.in

कित्येकदा असं होतं की मुलं भारी गुण काढतात, पण घरातली परिस्थिती बेताची असते. शेतकरी, मजूर, दैनंदिन काम करणारे आईवडील एवढं शिक्षण परवडत नाही. पण आता काळजीचं कारण नाही. SBI Foundation ने मुलांना स्वप्न पूर्ण करायला एक सुवर्णसंधी दिलीय ती म्हणजे,Platinum Jubilee Asha Scholarship 2025.

अर्जाची वेळ

ही शिष्यवृत्ती 19 सप्टेंबर 2025 पासून सुरू झाली आहे. अर्ज करण्यासाठी जास्त वेळ नाही, कारण शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2025 आहे. शेवटच्या दिवसाची वाट बघितली तर फार गडबड होईल. म्हणून ज्यांना अर्ज करायचा आहे त्यांनी लगेच तयारी सुरू करावी आणि अर्ज करून टाकावा.

पात्रता काय आहे?

या शिष्यवृत्तीचा फायदा घ्यायचा असेल तर आधी काही अटी आहेत. मागच्या वर्षीच्या परीक्षेत किमान 75% गुण किंवा 7 CGPA मिळायला हवेत. SC/ST विद्यार्थ्यांना थोडं सूट दिलं आहे. त्यांना 67.5% किंवा 6.3 CGPA पुरेल. घरचं वार्षिक उत्पन्न शालेय विद्यार्थ्यांसाठी 3 लाख, तर इतर विद्यार्थ्यांसाठी 6 लाखांपेक्षा कमी असावं.

हे सुद्धा वाचा:- PM Internship Scheme 2025 Phase 2, अंतिम तारीख, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

शिष्यवृत्तीची रक्कम किती आहे?

या योजनेत दिलेली रक्कम खूप मोठी आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना 15,000 रुपये वर्षाला, तर पदवीधरांना 75,000 रुपये, पदव्युत्तर विद्यार्थ्यांना 2,50,000 रुपये मिळतील. डॉक्टरकी करणाऱ्यांना 4,50,000 रुपये, IIT विद्यार्थ्यांना 2,00,000 रुपये, IIM विद्यार्थ्यांना 5,00,000 रुपये मिळतील. एवढंच नव्हे तर परदेशात शिकायला जाणाऱ्यांना थेट 20 लाखांपर्यंत मिळणार आहेत.

आवश्यक कागदपत्रं काय आहेत?

अर्ज करताना काही कागदपत्रं तयार ठेवावी लागतील. यात मागच्या वर्षाचं गुणपत्रक, उत्पन्नाचा दाखला, आधारकार्ड किंवा दुसरं ओळखपत्र, प्रवेश प्रमाणपत्र, बँक पासबुकची कॉपी आणि पासपोर्ट साईज फोटो लागतं. ही सगळी कागदपत्रं आधी तयार ठेवली तर अर्ज करताना त्रास होणार नाही.

अर्ज प्रक्रिया काय आहे?

अर्ज करायला अगदी सोपं आहे. आधी वेबसाईट sbischolarship.co.in उघडा. तिथं शिष्यवृत्तीची माहिती नीट वाचा. मग “Apply Now” वर क्लिक करा. फॉर्म नीट भरा, सगळी कागदपत्रं अपलोड करा आणि सबमिट करा. शेवटी फॉर्मची एक कॉपी सेव्ह करून ठेवा, भविष्यात उपयोगी पडेल.

SBI Platinum Jubilee Asha Scholarship 2025 Important Links

लिंकचे नावURL
अधिकृत वेबसाईटclick here
अर्ज फॉर्मApply Now

अरे बघ मित्रा, शिक्षण हीच खरी संपत्ती आहे. पैसा कमी आहे, पण मनात जिद्द असेल तर काहीही अशक्य नाही. SBI Platinum Jubilee Asha Scholarship 2025 हीच संधी आहे तुमच्या स्वप्नांना उडायला पंख देण्यासाठी. वेळ वाया घालवू नका, अर्ज आजच करा, मेहनत करा आणि भविष्य स्वतःच्या हातात घ्या. कारण, जे आज शिकतात, तेच उद्या जग जिंकतात.

टीप: हा लेख / व्हिडिओ फक्त शैक्षणिक आणि माहितीपूर्ण उद्देशांसाठी तयार केले आहेत. आम्ही कोणत्याही विशिष्ट नोकरी किंवा इंटर्नशिपच्या संधीची हमी देत नाही. परिणाम व्यक्तीनिहाय वेगवेगळे असू शकतात, आणि येथे दिलेली यशकथा किंवा उदाहरणे भविष्यातील यशाची हमी देत नाहीत.

Leave a Comment