Sensodyne IDA Shining Star Scholarship 2025-26: BDS विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी 50,000 रुपये शिष्यवृत्ती

Sensodyne IDA Shining Star Scholarship Programme 2025-26 ही BDS विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती मिळवण्याची एक सुवर्णसंधी आहे. दंतवैद्यकीय शिक्षणासाठी वाढणारा खर्च लक्षात घेता, ही Sensodyne Scholarship योजना गुणवंत पण आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी मोठा आधार ठरते. Haleon India (Sensodyne चे निर्माते) यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेली ही शिष्यवृत्ती भारतभरातील BDS प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी आर्थिक मदत देऊन त्यांच्या दंतवैद्यकीय करिअरचा मजबूत पाया घालते. योग्य मार्गदर्शन आणि आर्थिक साथ मिळाल्यास डॉक्टर होण्याचं स्वप्न नक्कीच साकार होऊ शकतं आणि ही शिष्यवृत्ती त्याच दिशेने एक महत्त्वाचं पाऊल आहे.

Sensodyne IDA Shining Star Scholarship 2025-26: BDS विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी 50,000 रुपये शिष्यवृत्ती

शिष्यवृत्तीचे नावSensodyne IDA Shining Star Scholarship Programme 2025-26
आयोजकHaleon India (Sensodyne)
कोर्सBachelor of Dental Surgery (BDS)
पात्रताBDS प्रथम वर्षातील विद्यार्थी (Government Seat Quota)
किमान गुण60% किंवा त्याहून अधिक
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न8,00,000 रुपये पेक्षा जास्त नसावे
शिष्यवृत्ती रक्कम50,000 रुपये प्रति वर्ष (४ वर्षे)
एकूण लाभ2,00,000 रुपये
अर्ज पद्धतOnline
अंतिम तारीख20 जानेवारी 2026

शिष्यवृत्तीचा उद्देश काय आहे?

या कार्यक्रमाचा मुख्य हेतू दंतवैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे, त्यांचे शैक्षणिक सातत्य टिकवून ठेवणे आणि भविष्यात चांगले दंतवैद्य घडवणे हा आहे. विशेषतः सरकारी कोट्यातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना खूप उपयुक्त आहे.

कोण अर्ज करू शकतो? (Eligibility)

ही शिष्यवृत्ती भारतभरातील BDS प्रथम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. विद्यार्थ्याने सरकारी किंवा सरकारी अनुदानित कॉलेजमध्ये Government Seat Quota मधून प्रवेश घेतलेला असणे आवश्यक आहे. मागील वर्ग किंवा सेमिस्टरमध्ये किमान 60% गुण असणे बंधनकारक आहे.

उत्पन्न व इतर अटी

अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक एकूण उत्पन्न 8,00,000 रुपये पेक्षा जास्त नसावे. जो विद्यार्थी सध्या कोणतीही इतर शिष्यवृत्ती घेत आहे, तो या योजनेसाठी पात्र ठरणार नाही. तसेच Haleon, Give Grants किंवा Buddy4Study संस्थांतील कर्मचाऱ्यांची मुले या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकत नाहीत.

शिष्यवृत्तीची रक्कम (Benefits)

या योजनेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दरवर्षी 50,000 रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाते. ही शिष्यवृत्ती सलग 4 वर्षांसाठी (BDS कोर्स कालावधी) दिली जाईल. त्यामुळे एका विद्यार्थ्याला एकूण 2,00,000 रुपये इतकी मदत मिळू शकते.

अर्ज करण्याची पद्धत

  • या शिष्यवृत्तीसाठी फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातात.
  • विद्यार्थ्यांनी Buddy4Study प्लॅटफॉर्मवर जाऊन नोंदणी करून अर्ज भरायचा आहे.
  • अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.

महत्वाची तारीख कोणत्या आहेत?

घटकतारीख
अर्ज सुरू होण्याची तारीखलवकरच जाहीर होईल
अर्ज करण्याची अंतिम तारीख20 जानेवारी 2026
अर्ज पद्धतOnline
शिष्यवृत्ती कालावधी4 वर्षे (BDS कोर्स कालावधी)
लिंकचा तपशीललिंक
शिष्यवृत्ती अर्ज लिंकCLICK HERE

Leave a Comment