15 Lesser-Known Career Options in India | भारतामध्ये कमी लोकांना माहित असलेले 15 Career Options

मित्रांनो मी 2016 पासून Blogging च्या क्षेत्रात काम करतोय. या काळात विद्यार्थ्यांसाठी Scholarship, Education, Jobs, Courses आणि Career यावर बरंच Content तयार केलं. या सगळ्या प्रवासात मला एक गोष्ट कायम जाणवली ती म्हणजे, आपल्या मुलांमध्ये Talent ची कमी नाही, पण Career Options ची माहिती कमी आहे. गावाकडे एखाद्या मुलाला “पुढे काय करणार?” असं विचारलं की Engineering, Doctor, सरकारी नोकरी, Police, Banking किंवा शिक्षक हीच काही मोजकी उत्तरं मिळतात. पण खरं सांगायचं तर आज Career चं जग खूप मोठं झालं आहे. अशा अनेक क्षेत्रांमध्ये संधी आहेत ज्यांची माहिती अजूनही आपल्या गावातल्या बहुतांश मुलांना नाही. म्हणूनच या लेखात मी अशाच 15 Career Optionsबद्दल माझ्या अनुभवातून आणि अभ्यासातून सोप्या भाषेत सांगणार आहे.

Drone Pilot आणि Drone Specialist

आजकाल Drone म्हटलं की आपल्याला लग्नाचं शूटिंग किंवा Instagram Reel एवढंच आठवतं. पण Drone चं जग त्यापेक्षा खूप मोठं आहे. Agriculture मध्ये शेताचं निरीक्षण, जमिनीचं Mapping, Construction Site ची पाहणी, Surveying, Infrastructure Inspection, Photography आणि अनेक कामांसाठी Drone चा वापर होतो. त्यामुळे फक्त Drone उडवायला शिकण्यापेक्षा Drone + Mapping + GIS अशी Skills ची जोडणी केली तर पुढे चांगली specialised career तयार होऊ शकते. माझ्या मते Technology आणि Outdoor काम दोन्ही आवडणाऱ्या मुलांनी हा पर्याय नक्की बघायला हवा.

GIS आणि Remote Sensing Specialist

GIS हे नाव ऐकलं की पहिल्यांदा थोडं भारी वाटतं, पण विषय सोपा आहे. साध्या भाषेत सांगायचं तर नकाशा, Geography आणि Computer Technology यांचा संगम म्हणजे GIS. एखाद्या शहरात Road कुठे करायचा, शेतीची माहिती कशी Map करायची, एखाद्या भागात पाण्याची उपलब्धता कशी आहे, Satellite Image मधून काय माहिती मिळते, अशा अनेक कामांसाठी GIS वापरलं जातं. Geography, Civil Engineering, Agriculture, Environment किंवा Technology मध्ये रस असणाऱ्या विद्यार्थ्यांनी हा Career समजून घ्यायला हवा. माझ्या मते Droneसोबत GIS शिकलं तर हा पर्याय आणखी भारी होतो.

Forensic Science

Crime झाल्यानंतर Police Investigation करते, हे आपल्याला माहिती आहे. पण त्या Investigation मध्ये Science चाही मोठा वाटा असतो. DNA, Fingerprints, Blood Samples, Toxicology, Documents आणि Digital Evidence यांचं scientific analysis करण्याचं काम Forensic Science मध्ये येतं. Science मध्ये interest असणाऱ्या आणि Investigation ची आवड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा वेगळा मार्ग आहे. 12वी Science नंतर Forensic Science मध्ये शिक्षण घेऊन पुढे specialisation करता येऊ शकते. आपल्या आसपास फार कमी मुलं या Career चा विचार करतात, त्यामुळे हा पर्याय विद्यार्थ्यांना माहिती करून देणं मला महत्त्वाचं वाटतं.

Food Stylist

हा Career ऐकून अनेक जण म्हणतील, “अरे बाबा, जेवण सजवणं पण Career आहे का?” हो, आहे! आपण एखाद्या Burger ची जाहिरात पाहतो आणि तो पाहताच खावासा वाटतो. पण तो Burger Camera समोर कसा ठेवायचा, कोणता Plate वापरायचा, Lighting कशी ठेवायची, Background कसा असावा आणि Food कसं आकर्षक दिसेल हे सगळं Food Styling मध्ये येतं. Food Brands, Hotels, Restaurants, Advertising Agencies आणि Social Media Content मध्ये याची गरज असू शकते. Food आणि Creativity दोन्ही आवडत असतील तर हा Career मस्त आहे.

Tea Taster

चहा प्यायला सगळ्यांनाच आवडतो; पण चहा चाखून त्याची Quality ओळखणं हा काही साधा विषय नाही. Tea Taster चहाचा Taste, Aroma, Colour आणि Quality यांचा अभ्यास करतो. Tea Estates, Tea Processing Companies आणि Tea Brands मध्ये अशा specialised कामांची गरज असते. आपल्या देशात चहाचा मोठा व्यवसाय असल्यामुळे Food आणि Beverage Industry मध्ये interest असलेल्या विद्यार्थ्यांनी हा वेगळा Career Option लक्षात ठेवायला हरकत नाही. पण फक्त “चहा आवडतो” म्हणून Tea Taster होता येत नाही; त्यासाठी proper training आणि industry knowledge लागते.

Perfumer किंवा Fragrance Specialist

आपण रोज Perfume, Deodorant किंवा इतर Fragrance Products वापरतो. पण हे Fragrance तयार करण्यामागे Chemistry आणि formulation चं मोठं Science असतं. Perfumer किंवा Fragrance Specialist ला वेगवेगळ्या सुगंधांचा अभ्यास, raw materials, formulation आणि product testing याबद्दल माहिती असावी लागते. Chemistry किंवा संबंधित Science background असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा specialised Career होऊ शकतो. Cosmetics, Personal Care आणि FMCG सारख्या industries मध्ये अशा skills चा उपयोग होतो. मला वाटतं Chemistry मध्ये रस असणाऱ्या मुलांनी नेहमीच्या Medical किंवा Engineering च्या पलीकडे हा पर्यायही एकदा पाहायला हवा.

Clinical Research Associate

औषध दुकानात येण्याआधी त्यामागे खूप मोठं Research असतं. Clinical Trials ही त्यातील महत्त्वाची प्रक्रिया आहे. Clinical Research Associate या कामात Clinical Trials च्या monitoring, documentation, research sites शी coordination आणि protocol-related कामांचा समावेश होऊ शकतो. Pharmacy, Biotechnology किंवा Life Sciences background असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा Career उपयोगी ठरू शकतो. Pharma Industry मध्ये जायचं असेल पण पारंपरिक Pharmacist चीच भूमिका करायची नसेल, तर Clinical Research हा एक वेगळा मार्ग आहे.

Regulatory Affairs Specialist

हा Career तर Pharmacy किंवा Life Science च्या विद्यार्थ्यांमध्येही अनेकदा दुर्लक्षित राहतो. Pharma किंवा Medical Device सारख्या regulated industries मध्ये एखादं Product बाजारात आणताना अनेक नियम, Documents आणि Approvals पूर्ण करावे लागतात. Regulatory Affairs Specialist या प्रक्रियेशी संबंधित Documentation, Compliance, Submission आणि Regulations चं काम पाहतो. थोडक्यात सांगायचं तर “Product तयार झालं, आता ते नियमांनुसार बाजारात कसं आणायचं?” या प्रश्नाच्या आसपास या Career चं काम फिरतं. नियम, Documentation आणि Pharma मध्ये रस असणाऱ्यांसाठी हा चांगला specialised option आहे.

UX Researcher

आजकाल UX Designer हे नाव थोडंफार ऐकायला मिळतं; पण UX Researcher म्हणजे काय हे अजूनही अनेकांना माहिती नाही. समजा एखाद्या कंपनीने Mobile App तयार केला. App दिसायला सुंदर आहे, पण लोकांना तो वापरताना कुठे अडचण येते? कोणतं Button समजत नाही? कोणती Process जास्त कठीण वाटते? ग्राहकाला नेमकं काय हवं आहे? हे शोधण्याचं काम UX Researcher करतो. User Interviews, Surveys, Usability Testing आणि User Behaviour Analysis यांसारखी कामं यात येतात. Psychology, Design, Research आणि Technology यांचं Combination आवडत असेल तर हा Career तुमच्यासाठी भन्नाट ठरू शकतो.

Accessibility Specialist

Technology सगळ्यांसाठी असायला हवी, पण Website किंवा App तयार करताना प्रत्येक युजर्सचा विचार होतोच असं नाही. Screen Reader वापरणाऱ्या व्यक्तीला Website वापरता येते का? Keyboard ने Navigation करता येते का? Text नीट दिसतोय का? Video ला Captions आहेत का? अशा गोष्टी तपासण्याचं काम Accessibility Specialist करू शकतो. Technology, UX आणि Accessibility यांचा अभ्यास करून या क्षेत्रात specialised career तयार करता येतो. हा Career अजूनही फार लोकांना माहिती नाही, म्हणून भविष्यासाठी लक्षात ठेवण्यासारखा पर्याय आहे.

ESG आणि Sustainability Specialist

आज कंपन्यांमध्ये फक्त Profit पाहिला जात नाही; Environment, Social Impact आणि Governance यांनाही महत्त्व वाढत आहे. यालाच ESG म्हणजे Environmental, Social आणि Governance असं म्हणतात. Sustainability Reporting, ESG Data, Environmental Impact, Compliance आणि Sustainability Strategy अशा कामांमध्ये या क्षेत्रातील professionals ची भूमिका असू शकते. Commerce, Finance, Management, Engineering किंवा Environmental Studies अशा वेगवेगळ्या background मधून या क्षेत्राकडे वळता येऊ शकतं. मला वाटतं पुढच्या काही वर्षांत या क्षेत्राची माहिती आजपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना होईल.

Sports Data Analyst

मित्रांनो आपल्याकडे Cricket म्हणजे फक्त Bat आणि Ball नाही; आता त्यामध्ये Data चाही मोठा खेळ आहे. कोणता Player कोणत्या Bowler विरुद्ध चांगला खेळतो, कोणत्या परिस्थितीत Performance कमी होतं, Opposition ची काय कमजोरी आहे, अशा अनेक गोष्टी Data च्या आधारे समजून घेता येतात. त्यामुळे Cricket किंवा Sports ची आवड असलेल्या आणि Maths, Statistics किंवा Computer मध्ये interest असलेल्या विद्यार्थ्यांसाठी Sports Data Analytics हा भारी combination आहे. Excel, Statistics, SQL, Python आणि Data Visualization यासारखी Skills शिकून या क्षेत्राकडे वळता येऊ शकतं.

Instructional Designer

आज Online Courses, Corporate Training आणि E-learning खूप वाढलं आहे. पण फक्त Video बनवलं म्हणजे चांगला Course तयार होत नाही. विद्यार्थ्याने काय शिकायचं, Course ची रचना कशी असावी, कोणता Topic आधी आणि कोणता नंतर द्यायचा, Quiz कुठे घ्यायचा आणि Learning सोपं कसं करायचं याचा विचार करावा लागतो. हे काम Instructional Designer करू शकतो. Content Writing, Education, Design, Canva, PowerPoint, Storyboarding आणि E-learning Tools मध्ये interest असणाऱ्या व्यक्तीसाठी हा खूप चांगला पर्याय आहे. विशेषतः Content क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा Career मला स्वतःला खूप practical वाटतो.

Sound Designer

Movie किंवा Web Series पाहताना आपण Actor, Actress आणि Story कडे लक्ष देतो; पण Background मध्ये येणारे आवाज आपल्याला जाणवतही नाहीत. पावसाचा आवाज, दरवाजा बंद होण्याचा आवाज, Footsteps, गाडीचा आवाज किंवा एखाद्या Scene ला योग्य वातावरण देणारे Audio Elements तयार करण्यामागे Sound Design ची भूमिका असते. Film, OTT, Gaming, Podcast, YouTube आणि Advertising मध्ये Audio Skills चा वापर होतो. Music आणि Technology दोन्ही आवडत असतील तर हा Career एकदम वेगळा आणि Creative आहे.

Bioinformatics Specialist

Bioinformatics म्हणजे थोडक्यात Biology आणि Computer Technology यांची जोडी. DNA, Genomic Data आणि Biological Information चं Computer च्या मदतीने Analysis करण्यासाठी या क्षेत्राचा उपयोग होतो. Biotechnology, Biology, Life Sciences किंवा Bioinformatics शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे Python, R, Statistics आणि Data Analysis सारख्या Skills शिकता येतात. Biology आवडतं पण पारंपरिक Laboratory Career पेक्षा Technology मध्येही काहीतरी करायचं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी हा Career खूप interesting आहे.

माझ्या अनुभवातून विद्यार्थ्यांना एक गोष्ट सांगावीशी वाटते

मी इतकी वर्षं Blogging करताना एक गोष्ट जवळून पाहिली आहे. विद्यार्थी हुशार असतात, पण त्यांच्यासमोर Options कमी असतात. विशेषतः गावाकडच्या विद्यार्थ्यांना आपल्या आसपास जे Career दिसतात तेच जगातील सगळे Career आहेत असं वाटतं. एखाद्या घरात कोणी Doctor नसेल, Engineer नसेल किंवा ITमध्ये काम करत नसेल तर त्या क्षेत्राची माहिती मिळणंही अवघड होतं. त्यामुळे Career निवडताना सर्वात आधी “मला माहिती असलेले Career कोणते?” हा प्रश्न न विचारता “माझ्यासाठी उपलब्ध Career Options कोणते आहेत?” हा प्रश्न विचारायला हवा.

फक्त पगार बघून Career निवडू नका

आज इंटरनेटवर 10 लाख रुपये पगाराच्या Jobs, भारतामधील सर्वात जास्त पगाराच्या Jobs अशा अनेक Lists दिसतात. पण माझ्या मते मुलांनी फक्त Salary पाहून Career निवडणं धोकादायक आहे. कारण एखाद्या Field मध्ये सुरुवातीचा पगार चांगला असला तरी ते काम आपल्याला आवडत नसेल तर दोन-तीन वर्षांनी आपण त्यातून बाहेर पडण्याचा विचार करू शकतो. त्यापेक्षा आवड + Skill + Demand + Growth या चार गोष्टींचा विचार करून Career निवडला तर निर्णय जास्त practical होतो.

Degree सोबत Skill जोडणं आज खूप महत्त्वाचं

माझ्या Blogging च्या अनुभवातून मला एक गोष्ट स्पष्ट दिसते. आज फक्त “मी अमुक Degree केली आहे” एवढ्यावर स्वतःची ओळख तयार करणं पुरेसं नाही. Degree सोबत एखादी practical Skill जोडली तर तुमची value वाढू शकते. उदाहरणार्थ Biology सोबत Coding, Geography सोबत GIS, Drone सोबत Mapping, Commerce सोबत ESG किंवा Design सोबत UX Research. अशा combinations मुळे तुमचं Profile इतरांपेक्षा वेगळं दिसू शकतं.

शेवटी एवढंच…आपल्या गावात एखाद्या Career बद्दल फार कमी लोकांना माहिती आहे म्हणून तो Career खराब आहे असं समजू नका. उलट कधी कधी जिथे माहिती कमी असते तिथेच आपल्यासाठी नवीन संधी असू शकते. पण नवीन Career दिसला म्हणून लगेच Course मध्ये पैसे भरू नका. आधी त्या Career मध्ये प्रत्यक्षात काम काय असतं, कोणती Qualification लागते, कोणत्या Skills लागतात, Internship मिळते का आणि Job Marketमध्ये संधी आहेत का हे तपासा.

मी 2016 पासून Content आणि Blogging च्या क्षेत्रात काम करताना एवढं नक्की शिकलो आहे की माहिती मिळवणारा माणूस निर्णय घेताना नेहमी एक पाऊल पुढे असतो. त्यामुळे Career च्या बाबतीतही एकच सांगतो. इतर लोक काय करत आहेत ते पाहून तुमचं आयुष्य ठरवू नका. आधी जगात उपलब्ध असलेले पर्याय समजून घ्या, मग स्वतःला त्यात कुठे पाहता येतं ते ठरवा.

कारण Career मोठा किंवा छोटा नसतो; आपल्या आवडीच्या क्षेत्रात आपण किती मोठं काम उभं करतो हे महत्त्वाचं असतं.

“माहिती नसल्यामुळे Career ची संधी सोडू नका; आधी Careerची माहिती घ्या, मग निर्णय घ्या.”

महत्त्वाची माहिती

या लेखामध्ये भारतातील कमी लोकांना माहिती असलेल्या काही Career Options ची फक्त माहिती आणि ओळख करून देण्याचा उद्देश आहे. तुम्ही यापैकी कोणताही Career Option निवडावाच, असा माझा आग्रह किंवा सल्ला नाही. प्रत्येक विद्यार्थ्याची आवड, शैक्षणिक पात्रता, क्षमता, आर्थिक परिस्थिती, Skills आणि भविष्यातील उद्दिष्टं वेगवेगळी असतात. त्यामुळे कोणताही Career निवडण्यापूर्वी त्या क्षेत्रातील Education, Eligibility, Course, Job Opportunities, Salary, Growth आणि प्रत्यक्ष कामाचे स्वरूप याबद्दल स्वतः योग्य माहिती घ्या आणि त्यानंतरच निर्णय घ्या. मी फक्त तुम्हाला पारंपरिक Career च्या पलीकडेही काही वेगळे पर्याय आहेत याची माहिती देत आहे; अंतिम Career Decision हा पूर्णपणे तुमचा असावा.

Nitin
Nitin

गेल्या 6 वर्षांपासून, आम्ही शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहोत आणि आमच्या प्रयत्नांमुळे अनेक विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळविण्यास मदत झाली आहे. तसेच, आम्ही अनेकांना योग्य करिअर मार्गदर्शन देऊ शकलो आहोत, याचा आम्हाला अभिमान वाटतो.

Articles: 78

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *